रत्नागिरी : महानगर गॅस कनेक्शन डिस्कनेक्ट होणार असल्याचे सांगून नागरिकांना फेक मेसेज किंवा फोन कॉल करण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. या माध्यमातून नागरिकांकडून आर्थिक फसवणूक केली जात असून, रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारच्या तक्रारींची संख्या वाढत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
महानगर गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून नागरिकांना तातडीने पैसे भरण्यास सांगितले जाते. तसेच लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास किंवा बँकिंगशी संबंधित माहिती देण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते. अशा प्रकारे मिळवलेल्या माहितीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केली जाण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. महानगर गॅसच्या नावाने आलेल्या कोणत्याही संशयास्पद कॉल, मेसेज किंवा लिंकवर विश्वास ठेवू नये. अनोळखी व्यक्तींना बँक खाते क्रमांक, कार्डची माहिती, UPI पिन, पासवर्ड किंवा OTP कोणत्याही परिस्थितीत शेअर करू नये.
संशयास्पद लिंकवर क्लिक करणे किंवा अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणतेही अॅप डाउनलोड करणे टाळावे. अशा प्रकारचा कॉल किंवा मेसेज प्राप्त झाल्यास नागरिकांनी संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी पोलिसांचा संदेश : सावधानता हाच आर्थिक फसवणूक टाळण्याचा प्रभावी मार्ग आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













