Breaking News
दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

दापोली : गणेशोत्सवासाठी दापोलीतून 50 गाड्या

banner 468x60

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दापोली बस स्थानकात गणपती उत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ५० गाड्या ऑनलाइन बुकिंगसाठी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे यांनी दिली.


गणपती उत्सव दीड महिन्यावर आला असल्याने गावाला येण्यासाठी चाकरमान्यांनी गाड्या बुकिंग करण्यास प्रारंभ केला आहे. तालुक्यातील अनेक ग्रामस्थ हे मुंबई, भाईंदर, बोरिवली, विरार आदी ठिकाणी कामानिमित्त राहतात.


वर्षातून एकदा गणपती उत्सवासाठी अधिकाधिक चाकरमानी गावाकडे येतात. त्यामुळे त्यांना गावाकडे येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ रेल्वे यांच्याकडून गाड्यांची बुकिंग करण्यात येते. गणेशोत्सवासाठी दापोली बसस्थानकात ५० गाड्या ऑनलाइन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.


गाड्या बुकिंग होतील तशा गाड्या ऑनलाइन बुकिंगसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक रेश्मा मधाळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *