दापोली तालुक्यातील उन्हवरे-जाधववाडी येथे भांडी घासत असताना सर्पदंश झालेल्या ४९ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. कविता किसन खापरे (वय ४९, रा. उन्हवरे-जाधववाडी, पो. वावघर, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या दरम्यान कविता खापरे या आपल्या घराच्या मागील पडवीमध्ये पायरीजवळ भांडी घासत होत्या. यावेळी त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला सापाने दंश केला. सर्पदंशामुळे त्यांच्या अंगठ्यातून रक्तस्राव होत असल्याने त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दापोली रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती अधिक उपचारांची गरज असल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून वालावलकर रुग्णालय, डेरवण, ता. चिपळूण येथे हलविण्यात आले. तेथे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.
दरम्यान, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी तपासणी करून कविता खापरे यांना मृत घोषित केले. त्यानंतर या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक ७२/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे.
ही घटना १९ सप्टेंबर रोजी पहाटे ४.१३ वाजता वालावलकर हॉस्पिटल, रत्नागिरी येथे घडल्याची नोंद असून, प्रकरणाची नोंद ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०.४२ वाजता करण्यात आली आहे. घटनेची पुढील कार्यवाही दापोली पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













