Breaking News
दापोली : जमीन घोटाळा? 621 गुंठे वक्फ जमीन व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करा, चौकशी पूर्ण होईपर्यंत बांधकाम आणि तृतीय पक्षाला हस्तांतरणास स्थगिती देण्याची मागणी, जाकीर शेकासन यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार चिपळूण : कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागातून अॅल्युमिनियम पत्रे, लोखंडी पाईपची चोरी, एकाविरोधात गुन्हा चिपळूण : कळंबस्ते येथे मध्यरात्री संशयास्पद हालचाली; इसम पोलिसांच्या ताब्यात दापोली : दारू पिल्यानंतर बेशुद्ध पडलेल्या 25 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू दापोली : घरात कामाला येणाऱ्या महिलेवर चोरीचा आरोप, 98 हजारांचे दागिने आणि रोकड लंपास

चिपळूण : कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागातून अॅल्युमिनियम पत्रे, लोखंडी पाईपची चोरी, एकाविरोधात गुन्हा

banner 468x60

कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग, अलोरे येथील सिमेंट गोदामातून अॅल्युमिनियमची पत्रे आणि लोखंडी पाईप चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी कोळकेवाडी येथील एका व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग, अलोरे येथे घडली. सिमेंट गोदामाच्या पश्चिम दिशेकडील डाव्या बाजूला लावण्यात आलेली अॅल्युमिनियमची पत्रे तसेच गोदामातील लोखंडी पाईप चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी प्रकाश जानू मोहिते (वय ५५, व्यवसाय चौकीदार, रा. कोळकेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गणेश प्रकाश कदम, रा. कोळकेवाडी याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरीस गेलेल्या मालामध्ये सुमारे ११ हजार रुपये किमतीची ८ बाय २.२५ फूट आकाराची अॅल्युमिनियमची ३९ पत्रे तसेच १,२०० रुपये किमतीचे ८ फूट लांबीचे आणि २ इंच व्यासाचे लोखंडी पाईप ५ नग यांचा समावेश आहे. चोरीच्या मालाची एकूण किंमत सुमारे १२,२०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, घटना ११ सप्टेंबर रोजी घडली असली तरी गुन्ह्याची नोंद २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.४० वाजता करण्यात आली. संबंधित अधिकारी अभिजीत मनोहर पुतके हे रजेवर असल्याने त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. ते रजेवरून हजर झाल्यानंतर चोरीबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला. त्यानंतर चौकशीअंती पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

या प्रकरणाचा पुढील तपास अलोरे-शिरगाव पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *