Breaking News
दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

चिपळूण : तब्बल 400 तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून 29 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तरुणास अटक

banner 468x60

मॉलमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो, तसेच चारशे बेरोजगार तरुणांना नोकरी देतो, असे आमिष दाखवत चिपळुणातील तरुणाने नाशिकच्या इगतपुरी भागात सुमारे २९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चिपळूणच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

दिनेश गणपत पवार (सध्या रा.गिरणारे, इगतपुरी) असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो मूळचा चिपळूण तालुक्यातील ओमळी पवारवाडी मारुती मंदिराजवळील रहिवासी आहे.

या प्रकरणी शंकर आनंदा उबाळे (वय ४२, रा.खालची पेठ, गणपती मंदिराजवळ, इगतपुरी) यांनी इगतपुरी पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित आरोपी दिनेश पवार याने २०१६ पासून इगतपुरी शहरातील रहिवासी शंकर उबाळे व संदीप काशिनाथ फोडसे, पोपट बुधा भले यांच्याशी मैत्री केली.

तुम्हाला एका मॉल कंपनीचे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून १५ लाख ५० हजार रुपये बँक खात्यातून ग्रीन रेबीड कार्डद्वारे घेतले, तसेच नोकरी देतो, असे सांगून चारशे बेरोजगार तरुणांकडून प्रत्येकी ३ हजार ५०० रुपये, याप्रमाणे १४ लाख रुपये जमा करून, एकूण २९ लाख ५०० हजार रुपयांची फसवणूक केली,

असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये चारशे बेरोजगार तरुण व तीन हातमजूर आहेत. यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *