दारूचे व्यसन असलेल्या गुहागर तालुक्यातील ५२ वर्षीय व्यक्तीची उपचारासाठी मुंबईला घेऊन जात असताना अचानक प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद शंकर माने (वय ५२, रा. पेवे पांगारी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांना दारूचे व्यसन होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेतून गुहागरहून मुंबईच्या दिशेने नेण्यात येत होते.
२० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास प्रवासादरम्यान त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी (ता. खेड) येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४१/२०२६ अशी करण्यात आली असून, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये वारस नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची नोंद २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.०५ वाजता करण्यात आली. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













