Breaking News
दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

दापोली : आंजर्ले मुर्डी येथून एक महिला बेपत्ता

banner 468x60

आंजर्ले जवळील मुर्डी येथून एक 33 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारात व बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत दापोली पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास आंकाक्षा आनंद बेनेरे ( रा. राममंदिर, मुर्डी ) या मुलगी नेहा हिला आंगणवाडित सोडून आंजर्ले येथे कामावर जात असल्याचे घरच्यांना सांगून घराबाहेर पडली.

मात्र, सायंकाळपर्यंत घरी न परतल्यान तिच्या घरच्यांनी तिच्या कामावर, गावात तसेच नातेवाइकाकडे शोध घेतला. ती मिळून न आल्याने पती आनंद यांनी रविवारी आंकाक्षा हि बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

याबाबत दापोली पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हेडकॉन्स्टेबल मोहिते करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *