गुहागर : वहाळात बुडून वृद्धाचा मृत्यू

banner 468x60

शेतात काम करून घरी परतत असताना वहाळाच्या पाण्यात बुडून वडद – कुंभारवाडी येथील वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (२ ऑगस्ट) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

रमेश भागोजी राऊत (६५) असे त्यांचे नाव आहे. रमेश राऊत हे आपल्या घराजवळील शेतामध्ये काम करण्यासाठी दुपारी गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी शोध घेण्यास सुरुवात केली.

यावेळी शेतात जवळील असलेल्या वहाळात रमेश राऊत हे मृतावस्थेत आढळले. याप्रकरणी गुहागर पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

हा प्रकार नेमका कसा घडला, कधी घडला, याबाबतचा अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल हनुमंत नलावडे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *