रत्नागिरी : इजिप्तच्या नागरिकाचा जहाजावर मृत्यू, जयगड सागरी पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद

banner 468x60

अरबी समुद्रात प्रवास करणाऱ्या MV REK ELITE या जहाजावरील इजिप्तच्या नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जयगड सागरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इस्लाम आदेल अहमद अब्देल लतिफ (वय ३५, व्यवसाय–सेफ्टी ऑफिसर/थर्ड ऑफिसर, रा. इजिप्त) हे MV REK ELITE या जहाजावर कार्यरत होते. दि. १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास जहाज अरबी समुद्रातील १४.१० N / ५५.२८ E या लोकेशनवर असताना ही घटना घडल्याचे नोंदविण्यात आले आहे.

घटनेनंतर संबंधित वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटद-खंडाळा येथील अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दि. १६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.४५ वाजता जेएसडब्ल्यू पोर्ट, जयगड येथे MV REK ELITE या जहाजावर जाऊन वैद्यकीय कार्यवाही केल्याची नोंद आहे.

या आकस्मिक मृत्यू प्रकरणाची सुरुवातीची कागदपत्रे यलोगेट पोलिस स्टेशन, मुंबई यांच्याकडे होती. मात्र घटनास्थळ त्यांच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याने संबंधित कागदपत्रे परत रत्नागिरी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झाली.

त्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून दि. १० सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार हे प्रकरण पुढील चौकशीसाठी जयगड सागरी पोलिस ठाण्याकडे पाठविण्यात आले. त्यानुसार जयगड सागरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद रजिस्टरी दाखल करून पुढील तपासाची कार्यवाही सुरू केली आहे.

या प्रकरणी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेशी संबंधित अन्य बाबींचा तपास करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *