खेड : भोस्ते घाटातील कंटेनर अपघातात दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

banner 468x60

मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटामध्ये महामार्गाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात गुरुवारी (दि.३) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दोन ट्रक कोसळून भीषण अपघात झाला.

👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909

यामध्ये महामार्गाच्या डाव्या बाजूला सुमारे पस्तीस फूट खोल हे दोन्ही ट्रक कोसळले होते. त्यातील एका ट्रकमध्ये तीन लोक अडकले होते. या घटनेत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच एक जण गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माशांचे जाळे घेऊन मुंबई क्या दिशेने जाणारा एक आयशर ट्रक व कंटेनर यांच्यात हा अपघात झाला आहे. दोन्हीही वाहने गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होते भोस्ते घाटातील मोठ्या अवघड वळणाच्या काही अंतर अलीकडे हा अपघात झाला.

नियंत्रण सुटलेल्या कंटेनर ची पुढे चाललेल्या ट्रकला धडक लागल्यानंतर बाजूला मोठ्या खड्ड्यामध्ये आयशर ट्रक तब्बल 35 ते 40 फूट खड्ड्यात कोसळला व त्या पाठोपाठ कंटेनर देखील उलटला. रात्री उशिरापर्यंत हे मदत कार्य सुरू होते. या घटनेतील मृत व्यक्तींची अद्याप नावे समजू शकलेली नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *