Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दापोली : नितीन देसाई यांच्या निधनानंतर दापोलीतील नागरिक शोकाकूल

banner 468x60

प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई यांनी कर्जतच्या ND स्टुडिओत आत्महत्या केली. नितीन देसाई यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वाला हादरा बसला आहे.

👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909

अत्यंत कुशल कलावंत आपण गमावला आहे. नितीन देसाई यांचा जन्म दापोली येथे झाला. त्यांच्या आत्महत्येची बातमी कळताच रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील पाचवली गावावर शोककळा पसरली.

नितीन देसाई यांचे मुळगाव दापोली तालुक्यातील पाचवली आहे. नितीन देसाई दरवर्षी गणपतीत पाचवली येथील घरी येत असतात. गावात नितीन देसाई यांचे मूळ घर आहे. आई, वडील भावंड याच गावात होते.

नितीन देसाई यांची गावातील मारुती मंदिर वर श्रद्धा होती. काही चित्रपटांचे प्रमोशन देसाई यांनी आपल्या गावातील मंदिरात केले होते. देसाई यांच्या आत्महत्येची बातमी कळताच गावातील अनेक नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. नितीन यांचे बालपण पाचवली गावात गेले.

त्यांनी गावातील मराठी शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. गावात त्यांच्या खूप आठवणी आहेत गावाबद्दल त्यांना खूप ओढ होती. दरवर्षी शिमगा आणि गणपतीत ते आपल्या गावी येत असत. नितीन देसाई यांनी कर्जाच्या ओझ्याखाली येत इतकं टोकाचं पाऊल उचललं असल्याची शक्यता आहे. यासंबंधात पोलिस तपास करत आहेत.

दरम्यान नितीन देसाई यांची मुलगी आणि जावई अमेरिकहून परत आल्यावर उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सध्या त्यांचे पार्थिव मुलुंड येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *