तालुक्यातील आसूद बाग सातारकरवाडी येथे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत ६ लाख ४२ हजार ३०० रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना रविवार दि. ३० जुलै रोजी संध्याकाळी ६ ते एक ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.३० या मुदतीत घडली.
शैलेश बांद्रे (३१, रा. आसूद बाग सातारकरवाडी) यांच्या घरात कोणीही नसताना अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूस असलेल्या भिंतीवरील खिडकीमधून तसेच उघड्या असलेल्या किचनच्या दरवाजामधून घरात प्रवेश केला.
बेडरूममध्ये ठेवलेल्या कपाटातील ड्रॉवरची चावी घेऊन त्या चावीने बाजूला असलेले कपाट उघडले. या घटनेत कपाटामध्ये ठेवलेल्या तिजोरीच्या चाव्या घेऊन चोराने तिजोरी उघडून आणि त्यातील ६ लाख ४२ हजार ३०० रुपयांचे दागिने लांबवले. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात शैलेश बांद्रे यांनी फिर्याद नोंदविली आहे.
अज्ञाताच्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पी. एस. पाटील अधिक तपास करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















