दापोली शहरातील बीएसएनएल कार्यालयात अनधिकृत प्रवेश करून केबल चोरी केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५७ वाजण्याच्या सुमारास बीएसएनएल कार्यालयात घडली.
याप्रकरणी विजय राम मिना (वय ३५, रा. नम्र विलास भवन, बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, आझाद मैदान, दापोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून विशाल पर्शराम सर्वे (वय ३०, रा. सडवे सुतारवाडी, ता. दापोली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने बीएसएनएल कार्यालयातील ओसी लॅन रूमच्या विंडो एसीचा दरवाजा बाहेरून तोडून व उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर संबंधित खोलीतील निळ्या व लाल रंगाची डीसी केबल चोरी करून नेल्याचा आरोप आहे.
या चोरीतील केबलची किंमत सुमारे ७ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०२/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१(३) व ३०५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













