दापोली : बसस्थानकात पोलिस मदत कक्ष

banner 468x60

दापोली बसस्थानकात पोलिस मदत कक्ष नसल्यामुळे पोलिसांची गैरसोय होत होती आणि प्रवाशांच्या संरक्षणाचाही प्रश्न होता.

banner 728x90

👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909

त्यासाठी दापोलीतील प्रसिद्ध व्यापारी मनोहर जैन यांनी पुढाकार घेऊन पोलीस मदत कक्ष तयार करून दिला. त्याचे लोकार्पण बसस्थानकात मोठ्या उत्साहात करण्यात आले.

यावेळी महावीर एम्पोरियमचे मालक मनोहर जैन आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मुनाफ राजापकर, दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक अहिरे, उपनिरीक्षक राजकुमार, अर्जुन यादव, गंगधर, भारतीय जनता पार्टीचे स्वरूप महाजन, वाहतूक निरीक्षक हर्षल नाफडे, ओम शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष राकेश माळी व मंडळाचे सदस्य व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *