दापोली तालुक्यातील आंजर्ले-हर्णे बायपास रस्त्यावर मोठा ट्रक अडकल्याने आज, ११ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजल्यापासून वाहतूक ठप्प झाली आहे. ट्रक मोठा असल्याने बायपासवरील वळणावर त्याला वळवता न आल्याने तो रस्त्याच्या मधोमध अडकला आहे.
या घटनेमुळे बायपास मार्गावरील मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. मात्र दुचाकीस्वारांना या ठिकाणाहून मार्ग काढता येत असल्याची माहिती आहे. मोठ्या वाहनांना मात्र पुढे जाता येत नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे.
ट्रक हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंजर्ले-हर्णे बायपास मार्गावरून जाणाऱ्या मोठ्या वाहनचालकांनी सध्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक सुरळीत होईपर्यंत वाहनचालकांनी या मार्गावर अनावश्यक गर्दी करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













