रत्नागिरी जिल्ह्यात‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरी पोलीस दल आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’ या जनजागृती अभियानासाठी ‘रेन रन’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाला पालकमंत्री डॉ. उदय सामंत तसेच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेन रन मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली.

यावेळी अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचे आवाहन करत नशामुक्त समाजाचा संकल्प करण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने या अभियानात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.

दरम्यान, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची देशातील उत्कृष्ट पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवर, पोलीस अधिकारी, अंमलदार आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या रेन रनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’चा निर्धार करत अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीचा संदेश यावेळी देण्यात आला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













