भारतीय जनता पार्टीच्या चिपळूण शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी रुही खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिपळूण शहर मंडळाचे अध्यक्ष मकरंद (आशिष) चंद्रकांत खातू यांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी नियुक्तीपत्राद्वारे त्यांना ही जबाबदारी सोपवली.
चिपळूण शहरातील भाजप महिला मोर्चाचे संघटनात्मक काम अधिक प्रभावीपणे राबवणे, महिलांना पक्षाच्या माध्यमातून संघटित करणे आणि पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे, अशी महत्त्वाची जबाबदारी रुही खेडेकर यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच केंद्र आणि प्रदेश कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही त्यांना भर द्यावा लागणार आहे.
नियुक्तीपत्रात सर्वांना सोबत घेऊन संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे कराल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या नियुक्तीपत्राची प्रत दक्षिण रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे यांनाही पाठविण्यात आली आहे.
रुही खेडेकर यांच्या नियुक्तीमुळे चिपळूण शहरातील भाजप महिला मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा पक्षाच्या वर्तुळातून व्यक्त होत आहे. आगामी काळात महिला मोर्चाच्या माध्यमातून पक्षाचे उपक्रम, महिला सक्षमीकरण आणि संघटनवाढीसाठी कोणते कार्यक्रम राबविले जातात, याकडे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













