संगमेश्वर तालुक्यातील आबलोली ते जाकादेवी मार्गावरील मांजरे बुडबुड्याचे पाणी येथे एसटी बसने अॅक्टीव्हा दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पिता-पुत्र जखमी झाले. हा अपघात शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास घडला.
विघ्नेश अनंत चव्हाण (वय १८, रा. राई रांजेवाडी) हा आपल्या ताब्यातील अॅक्टीव्हा मोटारसायकल क्रमांक एमएच ४६ बीजी ८१४९ वरून वडील अनंत तुकाराम चव्हाण (वय ६०) आणि आई रुपाली अनंत चव्हाण (वय ५६) यांना घेऊन राईहून काजुर्लीच्या दिशेने जात होता.
दरम्यान, मांजरे बुडबुड्याचे पाणी येथे समोरून येणारी एसटी बस क्रमांक एमएच ४० एन ९८७० चालक पुंडलीक शिवाजी केंद्रे (वय ३५, एसटी डेपो रत्नागिरी, सध्या रा. कारवांचीवाडी) याने हयगयीने व अविचाराने वेगात चालवून रस्त्याच्या उजव्या बाजूला आणून अॅक्टीव्हाला धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या अपघातात दुचाकी चालक विघ्नेश चव्हाण आणि मागे बसलेले त्यांचे वडील अनंत चव्हाण यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
याप्रकरणी प्रमोद अशोक जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमेश्वर पोलिस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













