दापोली ते दाभोळ मार्गावरील चंडिका देवीच्या कमानीजवळील फाट्याजवळ सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने डंपर उभा केल्याप्रकरणी चालकाविरोधात दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी अक्षता अजित गुजर (मपोहेकॉ/६२७) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीत अरबिंद कमलेश ठाकूर (वय २५, सध्या रा. श्रीराम नगर, दाभोळ, ता. दापोली, जि. रत्नागिरी) याने त्याच्या ताब्यातील डंपर क्रमांक GJ-46-AA-2048 हा दापोली-दाभोळ मार्गावरील चंडिका देवीच्या कमानीजवळील फाट्याजवळ सार्वजनिक रस्त्यावर अशा पद्धतीने उभा केला होता की, त्यामुळे वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
या प्रकरणी दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात गु.र.नं. २५/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता (BNS) कलम २८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.२३ वाजता दाखल करण्यात आला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













