रत्नागिरी शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरविरोधात रत्नागिरी शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी अशा प्रकारचे सायलेन्सर बसवून दुचाकी चालविणाऱ्या १० मोटारसायकलींचे सायलेन्सर जप्त केले असून, संबंधितांकडून २९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

शहरातील वाढत्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असून, विशेषतः बाजारपेठ व रहदारीच्या ठिकाणी अशा दुचाकींमुळे ध्वनिप्रदूषणाची समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली.

या कारवाईदरम्यान मोठ्या आवाजाचे आणि नियमबाह्य पद्धतीने बदल करण्यात आलेले सायलेन्सर असलेल्या मोटारसायकली पोलिसांच्या निदर्शनास आल्या. पोलिसांनी १० दुचाकींचे कर्णकर्कश सायलेन्सर जप्त केले. संबंधित वाहनचालकांवर नियमानुसार कारवाई करत एकूण २९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.


शहरात दुचाकींना मोठ्या आवाजाचे मॉडिफाइड सायलेन्सर बसवून फिरणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने वाहनांमध्ये अनधिकृत बदल न करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
कर्णकर्कश सायलेन्सरमुळे होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













