खेड : 40 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

खेड तालुक्यातील घाणेखंट येथील धापसेवाडी येथे ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली.

सुनिल बारक धापसे (वय ४०, रा. धापसेवाडी, घाणेखंट, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, त्यांनी आपल्या नवीन बांधलेल्या घराच्या पडवीमध्ये लोखंडी आळाला निळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. यात त्यांचा मृत्यू झाला.

ही घटना २६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ वाजता घडली. घटनेची नोंद खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७०/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *