राजापूर हातिवले एसटी बसस्थानकात बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या सुमारे ५५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा उपचारादरम्यान रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर व्यक्ती १९ ऑगस्ट २०२६ रोजी हातिवले एसटी बसस्थानक परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. त्याला रुग्णवाहिकेतून हातिवले प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे हलविण्यात आले.
त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला १९ ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना २४ ऑगस्ट रोजी दुपारी १.१६ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. पियुष यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरी जबाबावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, पुढील तपास राजापूर पोलिसांकडून सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













