रत्नागिरीत 178 ग्रॅम गांजासह तरुणाला अटक, 64 हजारांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

रत्नागिरी शहरानजीकच्या एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करत असताना नाचणकर चाळसमोर शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई करत एका तरुणाला गांजासह ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९ हजार रुपये किमतीचा १७८.५ ग्रॅम गांजा आणि ५५ हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी, २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

सुरज परशुराम नंदीवले (२३, मूळ रा. पाचवड, वाई, जि. सातारा; सध्या रा. नाचणकर चाळ, एमआयडीसी, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल शांताराम झोरे यांनी तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक एमआयडीसी परिसरात नियमित पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी नाचणकर चाळसमोर संशयित सुरज नंदीवले हा पोलिसांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे ९ हजार रुपये किमतीचा १७८.५ ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत गांजासह टीव्हीएस कंपनीची ५५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच-०८-एझेड-१५७५) जप्त करण्यात आली. गांजा आणि दुचाकी असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

संशयित सुरज नंदीवले याच्याविरोधात एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(२)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *