रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हातखंबा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील एटीएम फोडून रोकड लुटण्याचा अज्ञात चोरट्याने प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी, २५ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे हातखंबा परिसरात खळबळ उडाली असून, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे २.५३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने हातखंबा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या इमारतीमध्ये असलेल्या एटीएम मशीनमध्ये छेडछाड केली. त्यानंतर एटीएम फोडून त्यातील रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पहाटेच्या सुमारास बँकेतील एका सहकाऱ्याने शाखा व्यवस्थापक शीतल रमाकांत शिंदे यांना फोन करून एटीएम मशीन कोणीतरी फोडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच शीतल शिंदे यांनी तत्काळ बँकेत जाऊन पाहणी केली. त्यावेळी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या घटनेप्रकरणी शाखा व्यवस्थापक शीतल शिंदे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा क्रमांक १६७/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३४(१), ६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. एटीएम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह घटनास्थळावरील इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













