खेड : लोटे एमआयडीसीत थारची अनोळखी महिलेला धडक, गंभीर दुखापत

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर लोटे एमआयडीसी परिसरात भरधाव महिंद्रा थार रॉक्स वाहनाने एका अनोळखी महिलेला धडक दिल्याची घटना ६ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या अपघातात अंदाजे ४५ वर्षीय महिलेला किरकोळ तसेच गंभीर दुखापत झाली असून, अपघातप्रकरणी खेड पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९.१० वाजता मुंबई-गोवा महामार्गावर खेडहून चिपळूणच्या दिशेने महिंद्रा थार रॉक्स (क्र. MH-09-GU-7275) जात होती. लोटे एमआयडीसी येथील कॉर्टेवा कंपनीसमोर ही गाडी आली असता चालकाने वाहन भरधाव व हयगयीने चालविल्याचा आरोप आहे.

यावेळी मध्यवर्ती डिव्हायडरजवळून खेडच्या दिशेने जात असलेल्या अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी महिलेला थारने समोरून धडक दिली. या धडकेत महिलेला किरकोळ तसेच गंभीर दुखापत झाली. तसेच थार वाहनाचेही किरकोळ नुकसान झाले.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २३२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. चालक आरीफ इसाक साठविलकर (वय ३७, रा. परळेमाण, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेची फिर्याद अजित संतोष, पोलीस हेड कॉन्स्टेबल/१३९४, खेड पोलीस ठाणे यांनी दिली. जखमी महिलेचे नाव व गाव अद्याप समजू शकलेले नाही. प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *