रत्नागिरी : नाणार बॉक्साईट प्रकल्पाची 7 सप्टेंबरला जनसुनावणी, सागवे येथे आयोजन, प्रकल्पाविरोधातील आंदोलनाची धार वाढण्याची शक्यता

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाची जनसुनावणी येत्या ७ सप्टेंबर रोजी सागवे येथे आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे जनसुनावणी रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा जनसुनावणीची तारीख जाहीर झाल्याने प्रकल्पाविरोधातील आंदोलनाची धार आणखी वाढण्याची शक्यता आहे.

banner 728x90

नाणार आणि सागवे परिसरातील ग्रामस्थांनी या प्रकल्पाला संघटितपणे विरोध करण्याचा निर्धार केला आहे. नाणार परिसरातील सुमारे १४४.९५ हेक्टर क्षेत्रावर बॉक्साईट उत्खननाचा प्रस्ताव आहे.

या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याबरोबरच पाण्याचे नैसर्गिक स्रोत, शेती आणि आंबा बागायती धोक्यात येण्याची भीती स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रस्तावित उत्खनन प्रकल्पाला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत आहे.

७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जनसुनावणीत स्थानिक नागरिकांकडून प्रकल्पाच्या संभाव्य पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामांबाबत आक्षेप नोंदवले जाण्याची शक्यता असून, या सुनावणीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *