राजापूरमध्ये सोन्याचे दागिने गहाण ठेवून मिळालेली रक्कम तसेच रोख रक्कम परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी राजापूर तालुक्यातील पती-पत्नीविरोधात नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ४ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
याबाबत संगीता अशोक धुमाळ (वय ४०, व्यवसाय गृहिणी, रा. आंबेरकोणी, साखर, ता. राजापूर) यांनी नाटे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रविंद्र पुनाजी राड्चे आणि त्यांची पत्नी ऋतिका रविंद्र राड्चे, दोघेही रा. आंबेरकोणी, साखर, ता. राजापूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी साडेदहा वाजता राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या राजापूर शाखेत तसेच २४ मार्च २०२१ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तक्रारदार यांच्या राहत्या घरी संबंधित प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपी रविंद्र राड्चे यांनी त्यांची पत्नी ऋतिका हिच्या नावावर तक्रारदारांचे सोन्याचे दागिने गहाण ठेवले. हे दागिने श्रमिक सहकारी पतपेढी मर्यादित, साखर, राजापूर येथे गहाण ठेवून त्यातून ३ लाख ५४ हजार रुपये रोख रक्कम मिळवण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय तक्रारदारांची ८० हजार रुपये रोख रक्कम देखील परत करण्यात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदार यांनी वारंवार पैसे आणि दागिने परत करण्याची मागणी केली. मात्र आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच तक्रारदारांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सोन्याचे दागिने व रोख रक्कम आरोपींनी स्वतःच्या वापरासाठी वापरल्याचा आरोप असून, या सर्व प्रकरणात एकूण ४ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८१/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय दंड विधानातील कलम ४२०, ४०५, ४०६, ५०६ आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.२३ वाजता दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नाटे पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













