Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेडमध्ये 16 वर्षीय तरुणीचा झोपेतच मृत्यू, मध्यरात्री नातेवाईकांची धावपळ

banner 468x60

खेड तालुक्यातील तळे मांडवे येथे १६ वर्षीय युवतीचा झोपेतच अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मयुरी कैलास जगताप (वय १६) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. मयुरीच्या अचानक झालेल्या मृत्यूने जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी ही आपल्या आई-वडिलांसह भावंडांसोबत तळे मांडवे येथे राहत होती. नेहमीप्रमाणे कुटुंबीयांनी रात्री एकत्र जेवण केले. जेवण झाल्यानंतर मयुरी आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेली. त्यानंतर काही वेळातच ही दुर्दैवी घटना घडली.

दरम्यान, मयुरीचे नातेवाईक राजेंद्र रामचंद्र वाघे हे त्यांच्या खोलीत टीव्ही पाहत होते. रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना मयुरीच्या खोलीच्या दिशेने जोरात घोरण्याचा आवाज ऐकू आला. आवाजामुळे संशय आल्याने त्यांनी तातडीने मयुरीच्या खोलीत जाऊन पाहिले.

यावेळी मयुरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिला उठवण्याचा प्रयत्न करूनही तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. तिच्या चेहऱ्यावर पाणी मारूनही कोणतीही हालचाल किंवा प्रतिक्रिया न आल्याने नातेवाईकांची घाबरगुंडी उडाली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नातेवाईकांनी मयुरीला तातडीने उपचारासाठी कळंबणी येथील रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी मयुरीला मृत घोषित केले.

रात्रीपर्यंत कुटुंबीयांसोबत असलेल्या आणि जेवण करून झोपलेल्या मयुरीचा काही वेळातच अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून घटनेची नोंद करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेबाबत आवश्यक तपास सुरू आहे. मयुरीच्या अकाली आणि अचानक झालेल्या मृत्यूमुळे तळे मांडवे परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *