महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम’ अंतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवा वेळेत, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आपले सरकार पोर्टल’ सेवेमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ऑनलाइन सेवा पुरविणे, अर्जांचा वेळेत निपटारा करणे आणि नागरिकांचे समाधान यामध्ये रत्नागिरी पोलीस दलाने सलग दोन महिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

शासकीय विभागांच्या कामगिरीचे नियमित मूल्यमापन ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून केले जाते. या मूल्यमापनात नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचा वेग, अर्ज निकाली काढण्याची कार्यक्षमता तसेच नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद या बाबींचा विचार केला जातो. या सर्व निकषांमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने आघाडी घेत राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.

जून २०२६ मधील कामगिरी
जून २०२६ महिन्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडे विविध शासकीय सेवांसाठी नागरिकांकडून एकूण १ हजार ७२३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ हजार ६१० अर्जांचा वेळेत निपटारा करण्यात आला.
या कामगिरीच्या आधारे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने —
Overall Top Performing Service या श्रेणीत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
Service with Highest Citizen Score या श्रेणीतही राज्यात अव्वल स्थान पटकावले.
जून महिन्यात ‘आपले सरकार’च्या मूल्यमापनात रत्नागिरी पोलीस दलाला Timeliness Score १५.३२ आणि Service with Highest Citizen Score मध्ये १०.७२ गुण मिळाले.
जुलै २०२६ मध्येही अव्वल कामगिरी कायम
जुलै २०२६ मध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडे नागरिकांच्या विविध सेवांसाठी १ हजार ८०७ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १ हजार ७१२ अर्जांचा यशस्वी निपटारा करण्यात आला.
जुलै महिन्यातही रत्नागिरी पोलीस दलाने —
Overall Top Performing Service मध्ये राज्यात प्रथम क्रमांक,
Service with Highest Citizen Score मध्ये पुन्हा एकदा प्रथम क्रमांक
मिळवत आपले अव्वल स्थान कायम राखले.
जुलै महिन्यातील मूल्यमापनात रत्नागिरी पोलीस दलाला Timeliness Score ५०.६४ तर Service with Highest Citizen Score मध्ये ३५.६६ गुण मिळाले.
नागरिकाभिमुख सेवेला प्राधान्य
नागरिकांना पोलीस विभागाकडून आवश्यक असलेल्या विविध सेवा घरबसल्या आणि वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ऑनलाइन प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. अर्जांचा जलद निपटारा, पारदर्शक प्रक्रिया आणि नागरिकांच्या समाधानाला प्राधान्य दिल्यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे सांगण्यात आले.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.
भविष्यातही नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













