रत्नागिरी : मुल होण्यासाठी ‘विधी’च्या बहाण्याने 1.44 लाखांचे दागिने लंपास, रत्नागिरीत दोन महिलांविरुद्ध गुन्हा

banner 468x60

रत्नागिरी शहरातील आरटीओ कार्यालयाजवळील मानस रेसिडेन्सी येथे मुल होण्यासाठी औषध तयार करून विधी करण्याचे आमिष दाखवत एका गृहिणीची १ लाख ४४ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास ही घटना मानस रेसिडेन्सी, आरटीओ कार्यालयाजवळ घडली. फिर्यादी सान्वी समित आंब्रे (वय ३०, व्यवसाय गृहिणी) यांना आरोपी महिलांनी मुल होण्यासाठी विशेष औषध तयार करून धार्मिक विधी करण्याचे आमिष दाखवले.

यावेळी आरोपींनी सोन्याचे दागिने एका कागदात बांधून साडीत गुंडाळून ठेवण्याचे नाटक करत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर चलाखीने दागिने घेऊन पोबारा केला.

या फसवणुकीत ६९ हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे छोटे मंगळसूत्र तसेच ७५ हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे टॉप्स असा एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

या प्रकरणी ६ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६१/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१६(२), ३१८(४) आणि ३(५) अंतर्गत दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *