दापोली तालुक्यातील अडखळ येथील बौद्धवाडी परिसरात गुरुवारी (६ ऑगस्ट) पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात डंपरखाली चिरडून चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत नरेश भिसे (वय ३०, रा. आतगाव, केळशी) हे केळशीहून मांदिवलीच्या दिशेने जात होते. अडखळ बौद्धवाडीजवळ आल्यानंतर डंपरच्या चालक बाजूचे उजवे चाक मातीत रुतले. चाक बाहेर काढण्याच्या प्रयत्नासाठी चालक डंपरखाली उतरला असता, अचानक डंपर चालकाच्या बाजूला कलंडला.

बौद्धवाडी येथे आयशर टेम्पो रस्त्याच्या बाजूची साईड पट्टी खचल्यामुळे मातीत रुतला .सदर आयशर टेम्पो कशा पद्धतीने काढता येईल या उद्देशाने चालक नवनीत भिसे मु.केळशी वय ३० वर्षे हा खाली उतरले असता अचानक टेम्पो मातीत रुतून खचल्यामुळे उजव्या बाजूला उलटला आणि त्याखाली नवनीत भिसे चिरडले गेले.


या दुर्घटनेत नवनीत भिसे हे डंपरखाली चिरडले गेले. त्यांना तातडीने उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात पहाटे साडेचारच्या सुमारास दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

अपघात झाल्यानंतर डंपर मालक मिथुन प्रकाश चिंचघरकर यांना
तातडीने क्लिनरने बोलावून घेतले. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डंपर हा कवडोलीचे पोलीस पाटील मिथुन प्रकाश चिंचघरकर यांच्या घरातील असून, त्याची नोंदणी त्यांच्या आईच्या नावावर असल्याचे सांगितले जात आहे. या माहितीची अधिकृत पुष्टी संबंधित शासकीय यंत्रणेकडून अद्याप झालेली नाही.

मात्र, डंपरमध्ये नेमकी वाळू होती, रेती होती की माती, याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर प्रत्यक्षात वाळूची वाहतूक होत असताना कागदोपत्री खडी दाखवण्यात आली असेल, तर हा गंभीर प्रकार मानला जाईल. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित यंत्रणांनी याबाबत सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
या घटनेनंतर नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः वाहतूक रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास का केली जाते, हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे. जर संबंधित वाहतूक सर्व शासकीय परवानग्यांसह आणि नियमानुसार होत असेल, तर ती दिवसा करण्यास अडचण काय आहे? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
यासोबतच वाहतुकीसाठी आवश्यक परवानग्या होत्या का, तसेच वाहतुकीची वेळ शासनाच्या नियमांनुसार होती का, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही होत आहे.
अडखळ येथील या दुर्घटनेमुळे दापोली तालुक्यातील रात्रीच्या वाहतुकीबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आले असून, महसूल, आणि पोलीस प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, या अपघाताचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे केळशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













