(प्रतिनिधी:सागर गोवळे.)
दापोली :अंतर्गत येत असलेल्या उद्यानविद्या महाविद्यालयातील कृषी विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत एक कौतुकास्पद उपक्रम राबवला. दापोली तालुक्यातील पंचनदी येथील हनुमान वाडी येथे कोकणातील प्रमुख पिकांवरील किडींचे संकट आणि त्यांचे प्रभावी व्यवस्थापन या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ‘एकात्मिक कीड व्यवस्थापना’वर भर सध्या हवामानात होणारे अनपेक्षित बदल, वाढलेली आर्द्रता आणि अनियमित पाऊस यामुळे कोकणातील मुख्य आर्थिक कणा असलेली आंबा, काजू, नारळ आणि सुपारी ही पिके विविध किडींच्या प्रादुर्भावाने ग्रासली आहेत. यावर मात करण्यासाठी केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धतींचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कृषी विद्यार्थिनींनी या वेळी केले.
प्रमुख पिके व त्यांचे प्रभावी नियंत्रण आंबा पीक फळमाशी, तुडतुडे आणि खोडकिड्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागेची नियमित स्वच्छता, रक्षक/कामोत्तेजक सापळ्यांचा वापर आणि शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले.काजूवरील उत्पन्नावर पाणी फिरवणारी ढेकण्या कीड (टी मॉस्किटो बग) तसेच खोड व मूळ पोखरणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी योग्य उपाययोजनांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
नारळ व सुपारी: गेंड्या भुंगा, लाल पाम भुंगा, शेंधा कीटक आणि अतिसूक्ष्म कोळी (माईट्स) यांच्या नियंत्रणासाठी नियमित बाग निरीक्षण, जैविक घटकांचा वापर आणि प्रकाश सापळे (Light Traps) अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे पटवून देण्यात आले.
हा प्रात्यक्षिक कार्यक्रम उद्यानविद्या महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. गार्गी शिर्के, विषयतज्ज्ञ डॉ. समीर काळे, तसेच प्राध्यापक डॉ. निलेश दळवी, डॉ. सुमेध थोरात आणि डॉ. प्रज्ञा गुडदे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विद्यार्थिनी श्रेया कर्पे, उन्नती धोडी, निशा घोरपडे, स्वप्नाली जाधव, कोमल कडू, गायत्री कुंभार, रसिका मासये, समृद्धी आंबेकर, आदिती आंब्रे, श्रुती गोरीवले, सानिया राहटे, प्राची येलवे आणि सोनाली खर्चे यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थिनींच्या या प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शनामुळे पंचनदीतील शेतकर्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची मोलाची माहिती मिळाली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













