Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

गुहागरमध्ये लोखंडी साकव कोसळला, 6 जनावरे जखमी, एका बैलाचा मृत्यू

banner 468x60

गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठाणानजीक असलेला लोखंडी साकव अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. साकवाखाली अडकलेल्या ६ ते ७ जनावरांपैकी एका बैलाचा जागीच मृत्यू झाला, तर ६ जनावरे जखमी झाल्याची माहिती गुहागर आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने हालचाल करत मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या.

स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांच्या मदतीने साकवाखाली अडकलेली जनावरे बाहेर काढण्यात आली. मात्र, या दुर्घटनेत एका बैलाचा मृत्यू झाला असून उर्वरित सहा जखमी जनावरांवर पशुवैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, साकवाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *