रत्नागिरी : धनावडेवाडी बंधाऱ्यात 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील धनावडेवाडी बंधाऱ्यात पोहताना १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे गयाळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

banner 728x90

सार्थक सुहास गुरव (वय १६, मूळ रा. लांजा, सध्या रा. गयाळवाडी, रत्नागिरी) असे मृत मुलाचे नाव आहे. रविवारी सकाळी सार्थक हा गयाळवाडी परिसरातील मित्रांसमवेत पोहण्यासाठी धनावडेवाडी बंधाऱ्यावर गेला होता. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात जाऊन बुडू लागला.

सार्थक बुडत असल्याचे मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सार्थकला पाण्याबाहेर काढले. त्याला त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेमुळे सार्थकच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गयाळवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *