Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दाभोळ : कोळथरे येथे आंबा-काजू नुकसानभरपाई e-KYC व प्रधानमंत्री पिकविमा नोंदणी शिबिर उत्साहात संपन्न

banner 468x60

कोळथरे येथे कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या पुढाकाराने आंबा-काजू पिकांच्या नुकसानभरपाईसाठी आवश्यक e-KYC तसेच प्रधानमंत्री पिकविमा योजनेच्या नोंदणीचे विशेष शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

कोकणात झालेल्या आंबा व काजू पिकांच्या नुकसानीनंतर शासनाने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांनी e-KYC पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. मात्र ग्रामीण भागातील नेटवर्क समस्या आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिली होती. ही अडचण लक्षात घेऊन कृषी विभागाच्या सहकार्याने कोळथरे येथील आई आनंदी गोपाळ महाजन विद्यामंदिर प्रशाला येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराला जिल्हा परिषद सदस्या साधना महाजन, कृषी विभागीय अधिकारी मंचरे, जाधव, विद्याधर जोशी, ओंकार कात्रे, कौस्तुभ वैद्य, आदित्य देपोलकर, सिद्धी मयेकर, सुनील पेठे, अमेय हुंबरे, शाळेचे मुख्याध्यापक मंगेश नरवणकर, प्रशांत जाधव तसेच प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या शिबिराचा लाभ घेण्यासाठी कोळथरे, पंचनदी, गोमराई, आघारी, उसगाव, बोरिवली आदी गावांतील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या साधना महाजन यांनी सांगितले की, आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने दिलेली नुकसानभरपाई ही त्यांच्या अडचणीच्या काळातील मोठी मदत असून, महायुती सरकार कोकणातील शेतकऱ्यांच्या हितासाठी संवेदनशीलतेने कार्य करत असल्याचे या उपक्रमातून दिसून येते. वर्षभर मेहनत करूनही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदना कमी करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *