Breaking News

चिखलगाव : लोकसाधनेचा वर्धापन दिन सोहळा 1 ऑगस्टला, ग्रामीण विकासाच्या वाटचालीतील लोकसाधनेचा गौरव सोहळा

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात चिखलगाव येथे ग्रामीण भारताच्या सक्षमीकरणासाठी सन १९६७ पासून कार्यरत असलेल्या लोकसाधना संस्थेचा वर्धापन दिन सोहळा शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

banner 728x90

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून वैदेही रानडे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच दीपक सर्जेराव मेंगाणे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), रत्नागिरी जिल्हा परिषद आणि संदेश सुभाष कडव, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), रत्नागिरी जिल्हा परिषद हे मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

लोकसाधना संस्थेने गेल्या अनेक दशकांपासून ग्रामीण भागातील शिक्षण, सामाजिक विकास आणि लोकसहभागाच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे कार्य सातत्याने केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यात येणार असून, भविष्यातील उपक्रमांबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोकसाधना परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *