Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

राजापूर : घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 28 वर्षीय नराधमाविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

banner 468x60

राजापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. अश्या घटना समोर असताना राजापूर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना २१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणातील आरोपी नरेश काशीराम गुरव (वय २८, ता. राजापूर) याने पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. मात्र पीडितेने धाडस दाखवत मोठ्याने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यानंतर पीडितेचे वडीलही तेथे पोहोचले आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे मेजर दत्ताराम बाणे, पोलीस कर्मचारी निलेश कात्रे, स्वप्नील घाडगे आणि रामदास पाटील यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.
आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५(१), ७६ तसेच पॉक्सो कायदा कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास राजापूर पोलीस सहाय्यक निरीक्षक दीपज्योती पाटील करीत आहेत. अल्पवयीन मुलीवरील अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपीला कायद्यानुसार जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेने राजापूर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *