गुहागरमध्ये ज्येष्ठाचा घरात मृत्यू, न्यूमोनियावर उपचार सुरू असताना घडली घटना

banner 468x60

गुहागर तालुक्यातील देवपाट येथे ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा राहत्या घरात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस माहितीनुसार, अमर विठ्ठल जाधव (वय ७९, मूळ रा. औंध, पुणे, सध्या रा. देवपाट, ता. गुहागर) हे काही दिवसांपूर्वी त्यांच्या भाच्यासोबत देवपाट येथे डॉ. मंदार अशोक आठवले यांच्या घराशेजारी राहण्यासाठी आले होते. त्यांचा भाचा दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त कल्याण येथे गेला होता.

अमर जाधव हे काही दिवसांपूर्वी पंढरपूर वारीला गेले असता त्यांना न्यूमोनियाचा त्रास झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. तसेच त्यांना उच्च रक्तदाब (बीपी) आणि मधुमेह यांचाही त्रास असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, १६ जुलै रोजी रात्री १० ते १७ जुलै रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या दरम्यान देवपाट येथील राहत्या घराच्या हॉलमध्ये ते उपड्या अवस्थेत मृतावस्थेत आढळून आले. याबाबत डॉ. मंदार अशोक आठवले यांनी पोलिसांना माहिती दिली.

या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू (A.D.) क्रमांक २६/२०२६ बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *