Breaking News
दापोलीतील विद्यार्थ्यांनी पोक्सो अंतर्गत आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करण्याची केली मागणी, महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांना निवेदन दापोलीकर सायकलप्रेमींची पंढरपूर सायकल वारी उत्साहात संपन्न, 300 हून अधिक किमीचा सायकल प्रवास करत विठुरायाच्या चरणी नतमस्तक चिपळूण : लावणीसाठी लवकर उठण्याच्या वादातून सुनेकडून 71 वर्षीय सासूला मारहाण; चिपळूणमध्ये गुन्हा दाखल रत्नागिरी : पेन्शन कार्ड अपडेटच्या बहाण्याने 83 वर्षीय ज्येष्ठाची 1.68 लाखांची ऑनलाइन फसवणूक खेड : गोटलवाडीत भूस्खलनाच्या धोक्याची गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून पाहणी 19 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, मृतांच्या वारसांना 8 लाख, तर घरबांधणीसाठी 2 लाख 60 हजारांची मदत

रत्नागिरी : पेन्शन कार्ड अपडेटच्या बहाण्याने 83 वर्षीय ज्येष्ठाची 1.68 लाखांची ऑनलाइन फसवणूक

banner 468x60

पेन्शन कार्ड अद्ययावत करण्याच्या बहाण्याने एका ८३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ लाख ६८ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

banner 728x90

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कौस्तुभ श्रीनिवास गोरे (वय ४३, रा. टिळक आळी, रत्नागिरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ९ जुलै रोजी दुपारी त्यांच्या ८३ वर्षीय वडिलांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून पेन्शन कार्ड अद्ययावत करण्याबाबत माहिती दिली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवून त्यावर प्रक्रिया करण्यास सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांनी लिंकवर प्रक्रिया करताच आरोपीने त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस स्वतःकडे घेतला. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रच्या गाडीतळ शाखेतील त्यांच्या बचत व पेन्शन खात्यातून परस्पर १ लाख ६८ हजार ५०० रुपये काढून आर्थिक फसवणूक केली.

घटना लक्षात आल्यानंतर प्रथम राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर त्या तक्रारीच्या अनुषंगाने कौस्तुभ गोरे यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष फिर्याद दाखल केली.

या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर फसवणुकीचा अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करू नये, मोबाईलचा अॅक्सेस देऊ नये तसेच बँक किंवा शासकीय कामाच्या नावाखाली वैयक्तिक माहिती अथवा ओटीपी कोणालाही देऊ नये, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *