मुंबई : दादरमध्ये रंगणार ‘कोकण सन्मान सोहळा 2026’, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

banner 468x60

‘आम्ही कोकणकर’च्या वतीने ‘कोकण सन्मान सोहळा २०२६’ चे आयोजन रविवार, १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, दादर येथे करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोकणातील कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे.

banner 728x90

या सोहळ्याचे निवेदक शाहीर शाहिद खेरटकर असून, संस्थापक, लेखक, दिग्दर्शक व निर्माता म्हणून कृष्णा नंदा शांताराम येद्रे यांनी या कार्यक्रमाची संकल्पना साकारली आहे. कार्यक्रमाला पितांबरी अभिनव उत्पादने, खातू मसाला उद्योग, सर्वेश ज्वेलर्स आणि आर.डब्ल्यू.जी. ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

यावर्षी कला क्षेत्रातील अभिनेत्री शिवाली परब (महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम), प्रसार माध्यम व प्रसिद्धी क्षेत्रातील गौरी पवार (बिनधास्त मुलगी), उद्योजक क्षेत्रातील अजित निंबरे, शैक्षणिक क्षेत्रातील लोकेश राजाध्यक्ष, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. नागराज तेंडुलकर, सांस्कृतिक क्षेत्रातील शाहीर तुषार मधुकर पंदेरे, शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन, श्री देवी भगवती पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, पत्रकारिता क्षेत्रातील दीपक मांडवकर, सामाजिक क्षेत्रातील जल फाउंडेशन कोकण विभाग, मुंबई तसेच गड संवर्धन क्षेत्रातील दुर्गवीर प्रतिष्ठान यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.


याशिवाय, कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या रसिकांसाठी खातू मसाला उद्योगाचे शालिग्राम खातू यांच्या वतीने भेटवस्तूंचे वितरण करण्यात येणार असून, मनोरंजनासाठी विशेष कॉमेडी नाट्यकलाकृतीचे सादरीकरणही होणार आहे.

या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, मोफत प्रवेशिकांसाठी ९७७३१४२८१९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कोकणच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि कर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *