दापोली तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता कुडावळे गावालाही बसला आहे. कुडावळे येथील काटकरवाडीकडे जाणाऱ्या पुलाचा भराव 5 आणि 6 जुलैला झालेल्या पावसाच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहून गेला आहे.
भराव वाहून गेल्याने पुलावरील वाहतूक धोकादायक बनली असून ग्रामस्थांच्या दळणवळणावर परिणाम झाला आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि अत्यावश्यक सेवांसाठी या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून पुलाच्या भरावाची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित वाहतूक सुरू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













