गुहागर शहरातील कीर्तनवाडी परिसरात सोमवारी (६ जुलै) सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास वैयक्तिक वादातून ४५ वर्षीय व्यक्तीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेत संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कीर्तनवाडी येथील गणपती कारखानदार आणि वरचापाट परिसरातील एका तरुणाची पूर्वीपासून ओळख होती. घरगुती वादातून संबंधित तरुणाने कारखानदार यांच्या घरी जाऊन कोयत्याने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात जखमींच्या मानेवर, डोक्यावर आणि हातावर गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर जखमींना तातडीने गुहागर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण शोधले जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













