खेड : तालुक्यात भीषण भूस्खलन; घर कोसळले, एक महिला बचावली, दोघांचा ढिगाऱ्याखाली शोध सुरू

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण भूस्खलनाची घटना घडली. भूस्खलनामुळे एका घराचा काही भाग कोसळून घरातील तिघेजण ढिगाऱ्याखाली अडकले.

banner 728x90

या दुर्घटनेत ७५ वर्षीय कल्पना शेलार यांना ग्रामस्थांच्या तत्पर मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर सध्या कळबणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मात्र ८५ वर्षीय शांताराम बाळा शेलार आणि ३५ वर्षीय सतीश शेलार हे अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार, खेड पोलीस तसेच महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरू असून ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने आणखी भूस्खलनाचा धोका कायम आहे. काही घरे धोकादायक स्थितीत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *