दापोलीतील माथेगुजर येथे वादळाचा तडाखा; गोठ्याचे २७ पत्रे उडाले, सुदैवाने जीवितहानी टळली

banner 468x60

दापोली तालुक्यात शनिवारी (५ जुलै) झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा फटका अनेक भागांना बसला. यामध्ये माथेगुजर गावातील मोहन संभाजी पवार यांच्या गोठ्याचे सुमारे २७ पत्रे वादळामुळे उडाल्याची घटना घडली.

banner 728x90

या घटनेत गोठ्याचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने परिस्थितीची नोंद घेतली असून दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून दापोली तालुक्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जोर कायम असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *