दापोली : राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत स्वरूप कान्हेकरची चमकदार कामगिरी; तालुक्यात तृतीय, जिल्ह्यात 25 वा क्रमांक!

banner 468x60

ब्रिलियंट करिअर अकॅडमी, दापोली, मराठा मंदिर सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल, दापोली आणि श्री रामराजे इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई), दापोली यांच्या विद्यार्थ्याने *महाराष्ट्र राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटवला आहे.

banner 728x90

इयत्ता पाचवीचा विद्यार्थी स्वरूप संदीप कान्हेकर याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Pre Upper Primary Scholarship Examination) मध्ये उत्कृष्ट यश मिळवत दापोली तालुक्यात तृतीय क्रमांक तर रत्नागिरी जिल्ह्यात २५ वा क्रमांक पटकावला आहे.

स्वरूपच्या या यशामागे त्याची सातत्यपूर्ण मेहनत, पालकांचे प्रोत्साहन आणि संस्थेतील अनुभवी शिक्षकांचे दर्जेदार मार्गदर्शन यांचा मोठा वाटा असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या ब्रिलियंट करिअर अकॅडमीने या यशातून आपल्या शैक्षणिक परंपरेत आणखी एका मानाच्या यशाची भर घातली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या वतीने स्वरूप संदीप कान्हेकर, त्याचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. भविष्यातही स्वरूप शैक्षणिक क्षेत्रात अशाच उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवेल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.


स्वरूप कान्हेकरच्या या उल्लेखनीय यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *