खेड तालुक्यातील एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी सालीम जावीद मुकादम याने PUPPSS शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (इयत्ता पाचवी) मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत खेड तालुक्यात प्रथम क्रमांक आणि रत्नागिरी जिल्ह्यात ११ वा क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या परीक्षेत सालीमने २९८ पैकी २५२ गुण मिळवत उल्लेखनीय गुणवत्ता सिद्ध केली आहे. ग्रामीण भागातून येत असूनही त्याने मिळवलेले हे यश शाळा, कुटुंब आणि परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
सालीम जावीद मुकादम याला त्याच्या यशामागे कुटुंबीयांचे मोठे पाठबळ लाभले आहे. त्याच्या आई साजिया जावीद मुकादम, आजी मरियमबी ईसहाक मुकादम, काका मुस्तफा ईस्हाक मुकादम तसेच आजोबा (आईकडील) मोहम्मद हनीफ अब्दुल कादिर मुकादम यांनी त्याचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशाबद्दल अल मदिना वेल्फेअर असोसिएशनकडूनही अभिनंदन करण्यात आले आहे.
एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, खेडचे अध्यक्ष बशीर हजवानी आणि मुख्याध्यापिका सलवा तिसेकर यांनी सालीमचे अभिनंदन करून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्याच्या या यशामागे शाळेतील शिक्षकांचेही महत्त्वपूर्ण योगदान असून मेहजबीन महाडिक, पल्लवी सावंत, नगमा तांबे, फैजा पठाण, नुसरत खोत, नाहीदा मुल्लाजी आणि सुप्रिया माळी यांनी मार्गदर्शन केले.
सालीमच्या यशामुळे शाळेच्या यशाच्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













