खेड मडगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून धावत्या रेल्वेतून उडी मारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ घडली. या घटनेत शुभ्रा अतिश दिवेकर यांचा जागीच मृत्यू झाला असून, सचिन सत्यवान जुवळे आणि त्यांच्यासोबत असलेले दीड वर्षांचे बालक गंभीर जखमी झाले आहे. दोघांवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, मडगावहून मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसने तिघे प्रवास करत होते. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील मेटे गावाच्या हद्दीत रेल्वे धावत असताना त्यांनी अचानक गाडीतून उडी मारली. मुसळधार पावसात घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना त्वरित कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शुभ्रा दिवेकर यांना तपासून मृत घोषित केले.
सचिन सत्यवान जुवळे आणि दीड वर्षांच्या बालकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा अन्य काही कारणातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, खेड पोलीस आणि रेल्वे पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
दरम्यान, शुभ्रा दिवेकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असून, तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













