गुहागर पोलिसांनी दारुबंदी कायद्यांतर्गत केलेल्या कारवाईत वडद गावातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून गावठी हातभट्टीची दारू जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या कारवाईत १ जुलै २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मौजे वडद येथील ढापलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत काजू बागेतील झाडांच्या आडोशात रमेश रत्नु कातकर (वय ६८, रा. वडद गणपतवाडी, ता. गुहागर) याच्याकडे बेकायदेशीररित्या ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. सुमारे ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गु.र. नं. ५७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर त्याच दिवशी दुपारी साडेतीनच्या सुमारास वडद येथील काजुवाडी परिसरातील जंगलमय भागात, सागवान झाडांच्या आडोशात रामचंद्र बबन शिगवण (वय ६४, रा. वडद काजुवाडी, ता. गुहागर) याच्याकडेही बेकायदेशीररीत्या ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. या कारवाईतही ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गु.र. नं. ५८/२०२६ अंतर्गत महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.
या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल किरण नामदेव चव्हाण (गुहागर पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली असून गुहागर पोलीस पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













