देशभरात गाजलेल्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) चा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे उघडकीस आले आहे, त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून उद्या (२८ जून) होणारी ही परीक्षा तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे.
TET परीक्षेचा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. उद्या टीईटी परीक्षेचा पेपर होणार होता, मात्र हा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. 2 लाख 26 हजार शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, मात्र आता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आगामी काळात या पेपरची नवी तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे.
पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा प्रशासनाकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यात टीईटीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. 2 लाख 26 हजार शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटीचा पेपर घेण्यात येणार होता,मात्र आता पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
आता अधिकृत परिपत्रक जारी करून परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाणार आहे. पेपरफुटीवर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले की, ‘या सरकारला साधा टीईटीचा पेपर सांभाळता येत नाही. नीट पेपरफुटीचं केंद्र महाराष्ट्रात आहे, हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतं, हे सरकार झिरो टॉलरन्सच्या गोष्टी करतं. कुठे गुड गव्हर्नन्स आहे, कुठे झिरो टॉलरन्स आहे?
एवढ्या नीटच्या लोकांना जेलमध्ये टाकलं तरी टीईटीचा पेपर फुटतो. याचाच अर्थ सरकारचा पेपरफुटीमध्ये कुठेतरी सहभाग आहे. जे शिक्षक भावी पिढी घडवणार आहेत, त्या शिक्षकांची पात्रता परीक्षेचा पेपर फुटतो, याचा अर्थ आपण कुठे चाललोय हे पाहण्याची आवश्यकता आहे. हे कमकुवत सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे. म्हणून या सर्व गोष्टी होत आहेत. या छोट्या परीक्षेचा पेपर सरकार सांभाळू शकत नाही, याचाच अर्थ हे सरकार भगवान भरोसे चालू आहे. ‘

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













