रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरातील लांजेकर नगर येथे विनापरवाना गोवंश प्राण्यांच्या मांसाची वाहतूक व विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने धडक कारवाई करत त्याला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख ६ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लियाकत शौकत दावत (वय ४८, रा. लांजेकर नगर, उद्यमनगर, रत्नागिरी) असे आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार गणेश राजेंद्र सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २६ जून रोजी सायंकाळी सुमारे ४.५५ वाजण्याच्या सुमारास लांजेकर नगर परिसरात कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणताही वैध परवाना नसताना गोवंश प्राण्यांचे मांस विक्रीसाठी बाळगून असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून ७ किलो आणि ४४ किलो ५०० ग्रॅम वजनाचे गोवंश मांस, मांस वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली होंडा ॲक्टिव्हा दुचाकी (एमएच-०८ एझेड-६४८५) तसेच टाटा व्होल्टास कंपनीचा डीपफ्रिजर असा एकूण १,०६,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध काशिमिरा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम, २०१५ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, या प्रकरणात गोवंश मांसाचा स्रोत, त्याची वाहतूक आणि विक्रीचे जाळे याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













